'हॅलो '
"कोण बोलतंय?"
"तुझा बाप!"
असे शब्द ऐकले फोनवर की समोरचा क्षणभर का होईना बावचळत असेल किंवा अगदीच निडर असेल तर एक निमिष हादरत असेल, इतकी शक्ती आहे या बाप शब्दात. याच्यापुढे कोणीच नाही. सुप्रीम authority म्हणजे बाप, वडील, बाबा, पिता, तात. एक संरक्षक कवच असतं बाबाच आपल्या व्यक्तिमत्वाभोवती. कर्णाला जसे जन्मतः कवच कुंडले मिळाली होती तसेच असतात बाबा आपली कवच कुंडले.
आईसारखे बाबांशी पटकन कनेक्ट नाही होता येत. एक प्रकारचा भीतीयुक्त आदर असतो बाबा. कितीही मोठी संकट आली तरी बाबा भक्कमपणे उभा असतो पाठीशी. आपल्या आयुष्यातले आनंदाचे क्षण आपल्याही नकळत तो साजरे करत असतो. नंतर केव्हातरी कळतं. आई बाबा होणं इतकं सोपं असतं का? असे उद्गार एका डॉक्टर ने मला ऐकवले आहे. खरच आहे हे सोपं नाहीच . आणि त्यातल्या त्यात बाबा होणं तर फारच कठीण असं मला वाटतं. त्यांचे कणखर संस्कार आपल्या नकळत आपल्यावर होत राहतात. आपल्या आयुष्यात बाबांचं काय स्थान असतं हे बाबा नसले जास्त जाणवतं.
बाबांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. आईला परमेश्वराचे रुप मानतात, पण बाबाला पर्याय नाही. बाबा हा अतुलनीय,अभेद्य आहे कारण बाप बापच असतो असं मला वाटतं...

रसिका राजीव हिंगे
8600047066
8600047066

No comments:
Post a Comment