हळदीच्या पावलांनी
निघालीस तू सासरी
घालमेल जीवाची ही
किती दाटली ग उरी
प्रतिरूप तू माझेच
जणू मला ग भासले
तुला घडवतांना ग
आईपण मोहरले
पैठणीचा पदर तो
आता तूच सावर ग
दागदागिने सारेच
तुझे तूच आवर ग
नव्या वाटेवरी तुला
चालायचे बाळा आता
दिले तुला संस्कार ग
सोड शिदोरी ती आता
तुज निरोप देतांना
पापणकाठ ओलेता
मागे वळुनी पाहते
संस्कारित ही दुहिता
इथेच मी थांबते ग
ये होऊनि तू पाहुणी
तुझ्या सुखी संसाराची
सांग बाळे तू कहाणी
रसिका राजीव हिंगे

छान
ReplyDeleteआईच्या भावना सुंदर शब्दबद्ध केल्या आहेत.
ReplyDelete👌🏻👍
ReplyDeleteछान 👌👌
ReplyDelete