तुझी आवड म्हणून
ही तुझीच आवड म्हणून
वाचनाची गोडी लागली
तुझे वाचन वेड पाहून
मी ही कविता करू लागली
किती किती वाचायची ग तू
कथा कादंबऱ्या नि उपन्यास
चरित्र भयकथा बालसाहित्य
साऱ्यांचा लाभला सहवास
तुझा वाणवसा सांभाळीन
दे शक्ति मज माझिये माते
संस्कारित ऐसे ऋण दिधले
ही परंपरा पुढे चालविते
नकोच मज उतराई याची
वाढू दे पुढती ऐसे ऋण
वाचन छंद मी जोपासते
ही तुझीच आवड म्हणून
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment