फिरत होते इथे तिथे मी
उरी घेऊनी निराशेला
एक सुंदर गाव कोठला
फिरता फिरता मला भेटला
काय सांगू गावाची गंमत
मला भेटले इथे एक सखी
दुरावलेली चारदश आधी
पुन्हा भेटली माझी खेळगडी
मिळुनी दोघी एकत्र भेटलो
सुख दुःखास देत मुलामा
ऐसा फुलला मैत्री मेळावा
भारावले पाहुनी कृष्ण सुदामा
काय झाले गे बयो तुजला
का उदासवाणे दिसे वदन
भवसागरी चालता चालता
गेले ग मी एकटी थकून
जीवाभावाची सखी वदली
मी सोबती का होसी निराश
घे बोलून मनातले सगळे
कर मोकळे मन आकाश
अलौकिक अशी भेट घडली
निराशेचे मळभ गेले निघुनी
आधार आजही या मैत्रीचा
पुन्हा सुखावते आठवांनी
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment