तिन्हीसांजा म्हणजे कातरवेळ, मनाला अनामिक हुरहूर लावणारी सांजवेळ. सतत बाहेरच्या दाराकडे जाणारी नजर , कुणाची तरी वाट पाहणारी शामवेळ. आकाशात सांज का खुलते? सुर्यदेवाला निरोप देतांना जाता जाता तिच्या गालावर हळूच टिचकी देऊन सूर्यदेव गेले म्हणून लज्जेची ही लाली आहे की चंद्राची येण्याची वेळ झाली आहे,त्याची वाट बघतांना त्याच्या आठवणीत मोहरून आलेली अभिसारिका आहे. शामरंगी ढगांचे पुंजके नभात गोळा करून रासक्रीडा करणारी राधा आहे. सांज कुणीही असली तरी खूप मोहक आहे,वेड लावणारी आहे. हुरहूरणारी आहे.
सांजवेळ! प्रियकराला प्रेयसीने भेटण्याची वेळ, चिमण पाखरांची घराकडे परतण्याची वेळ, देवाजवळ शांतपणे तेवण्याऱ्या दिव्या च्या ज्योतीसम प्रसन्नतेची उधळण करणारी सांजवेळ. संस्कारांचे बीज पेरणारी सांजवेळ.
गोठयात वासराला प्रतिसाद देण्यासाठी धुळीत हरवलेली धुरकट सांज ही वात्सल्याचे प्रतीक. कधी विरहातल्या विरहिणीची ती सखी.
तर कधी प्रीतीचा साज लेऊन हळुवार पदन्यास करीत धुंद नृत्याविष्कार करणारी कामिनी म्हणजे सांजवेळ.
किती रूप ह्या सांजवेळेची. मनी जसा विचार तशी ही सांजवेळ असं मला वाटतं...
रसिका

No comments:
Post a Comment