गर्भातल्या या फुलानी
हाक हळूच दिधली
नाळ तुटता क्षणांती
साद आईचीच आली
मार्गावरी वात्सल्याचे
स्तंभ आगळे वेगळे
जीवनाच्या वाटेवरी
जगण्याचे हे सोहळे
मखमली झाली वाट
आधाराला कुठे माप
कोण्या जन्माची पुण्याई
सुख दाटले अमाप
ऐसा चालतो वारसा
जन्मा मागुती जन्माचा
दान ममतेचे लाभे
खेळ सारा संचिताचा
रसिका राजीव हिंगे

छान मस्त👌👍
ReplyDeleteशब्दाच्या पलीकडचे अव्यक्त आपण शब्दात अचूक पकडले
ReplyDelete