Monday, 3 May 2021

चित्रकाव्य

 



गर्भातल्या या फुलानी

हाक हळूच दिधली

नाळ तुटता क्षणांती

साद आईचीच आली


मार्गावरी वात्सल्याचे

स्तंभ आगळे वेगळे

जीवनाच्या वाटेवरी

जगण्याचे हे सोहळे


मखमली झाली वाट

आधाराला कुठे माप

कोण्या जन्माची पुण्याई

सुख दाटले अमाप


ऐसा चालतो वारसा

जन्मा मागुती जन्माचा

दान ममतेचे लाभे

खेळ सारा संचिताचा


रसिका राजीव हिंगे



2 comments:

  1. छान मस्त👌👍

    ReplyDelete
  2. शब्दाच्या पलीकडचे अव्यक्त आपण शब्दात अचूक पकडले

    ReplyDelete