रसिका राजीव हिंगे
साहित्याची अविरत नित्य वाहते गंगा
प्रासंगिक भान ठेवत वाहते गंगा
स्वरचित साहित्याला समजत येई बहर
चारोळी काव्य उमगत वाहते गंगा
प्रीतीच कृष्ण आहे राधेस त्या कळाले
कोणास उमगले जे कृष्णास समजलेले
ध्यासात तूच आहे ध्यानात तूच राणी
हे उमगले तुला का प्रेमात साचलेले
ध्यास तुझा नाद तुझा रात्रंदिन आहे
यास प्रेम म्हणावे हे तुला कळले का
प्रीती हा नसे खेळ ध्यास तो आहे
जे मला उमगले तुला समजले का
गर्भार हस्तिणी मातृत्वाने भारलेली
घाला दैवाचा सारे क्षणात संपले
संस्कृतीतील विकृती भयावह ही
मला न समजले कोणा न उमगले
रसिका
No comments:
Post a Comment