अतिथी!
येता अवचित दारी
तोच असेल श्रीहरी
स्वागतास अतिथीच्या
यजमाना ये सत्वरी
अतिथी देवो भव! घरी आलेला अतिथी किंवा पाहुणा हा देवा सम आहे असे संस्कार जपणारी आपली संस्कृती.
अतिथी म्हणजे आगंतुक. कोणतीही सूचना न देता अचानक पणे घरी आलेला पाहुणा. आलेला पाहुणा कोणत्या उद्देशाने आला आहे, केवळ भेटीचे प्रयोजन आहे की अजून विशेष काही हे महत्वाचे न मानता त्याचे स्वागत हे हसून केलेच पाहिजे असा पायंडा आपल्या परंपरेचा.
आपल्या घरी आलेला पाहुणा किंवा अतिथीचे स्वागत चांगल्या बुद्धीने, विचाराने, मनात कोणताही किंतु परंतु न ठेवता करावे असे पूर्वजांनी सांगितले आहे. थोडक्यात काय तर सकारात्मक भावनेने करावे. ही सकारात्मकता म्हणजे प्रचंड ऊर्जा आहे जगण्याची. या सकारात्मक विचारांच्या लहरी म्हणजे weves घरातील अदृश्य वाईट शक्तींचा सामना करायला कायम सज्ज असतात. म्हणून म्हणतात न की चांगले बोलावे. मनापासून स्वागत करतांना त्यातून जे सकारात्मक स्पंदने निर्माण होतात ती अतिथी आणि यजमान यांच्यामध्ये भावनिक नाते निर्माण करणारा दुवा आहे.
जसे अन्न ग्रहण करतो तसेच विचार होतात, मन तसंच होतं. सात्विक भावनेने बनविलेले भोजन अतिथीस अर्पण करावे म्हणजे ते ही आनंदी होतील आणि त्याचा परिणाम सारे घरही आनंदी होईल. आलेल्या अतिथीस समाधान लाभेल आणि आदरातिथ्य करण्याऱ्यास ही शुभाशीर्वाद लाभतील. माणुसकी आपोआपच जपली जाईल.
हे सगळे विज्ञान आहे जे ऋषी मुनींनी शोधले आहे, अनुभवले आहे. हा वारसा असाच पुढे जायला हवा हीच इच्छा?
हास्याचे उडावे तुषार
भावनेचा हो आदर
मान सन्मान सत्कार
व्हावे आनंदे सादर
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment