Wednesday, 6 April 2022

बकुळ




मंद गारवा गंध मारवा

दहा दिशाही धुंद जाहल्या

मनमनातील प्रीत फुलांनी

बकुळ फुलांचा सुगंध ल्याला


रूप मनोहर कोमल काया

गंध बावरा प्रीत लाजरा

चंद्रोत्सव या सावळ भू चा

संवत्सर भर होइ साजरा


स्पर्श बोलका भाव जाणतो

मौन जाहले शब्द अंतरी

गवाक्षातील निळी झुळूक 

क्षणी थबकली गंध लाजरी


पहुडलेल्या सर्द दुपारी

बकुळ फुलांचा गंधित उत्सव

चांदण राती घालुनी मांडव

रातराणीचा सजे महोत्सव


रसिका राजीव हिंगे



बकुळ#रसराज#गंध#सुगंध#





7 comments:

  1. व्वा सुंदर👌🙏

    ReplyDelete
  2. व्वा खुप सुंदर👌👌🙏

    ReplyDelete
  3. अप्रतिम! तरल भाव, आणि सुग॔धित काव्य

    ReplyDelete
  4. सुरेख रचना....

    ReplyDelete
  5. भावविभोर ....अप्रतिम !!

    ReplyDelete