मंद गारवा गंध मारवा
दहा दिशाही धुंद जाहल्या
मनमनातील प्रीत फुलांनी
बकुळ फुलांचा सुगंध ल्याला
रूप मनोहर कोमल काया
गंध बावरा प्रीत लाजरा
चंद्रोत्सव या सावळ भू चा
संवत्सर भर होइ साजरा
स्पर्श बोलका भाव जाणतो
मौन जाहले शब्द अंतरी
गवाक्षातील निळी झुळूक
क्षणी थबकली गंध लाजरी
पहुडलेल्या सर्द दुपारी
बकुळ फुलांचा गंधित उत्सव
चांदण राती घालुनी मांडव
रातराणीचा सजे महोत्सव
रसिका राजीव हिंगे
बकुळ#रसराज#गंध#सुगंध#
.jpeg)
व्वा सुंदर👌🙏
ReplyDeleteव्वा खुप सुंदर👌👌🙏
ReplyDeleteअप्रतिम! तरल भाव, आणि सुग॔धित काव्य
ReplyDeleteसुरेख रचना....
ReplyDeleteभावविभोर ....अप्रतिम !!
ReplyDeleteवाह
ReplyDeleteखूप छान
अप्रतिम
ReplyDelete