शब्द शब्द जुळत गेले भाव मनीचे उमटले काव्यप्राजक्त बहरले मन माझे गंधित झाले
भास की आभास
की वास्तव.
कळेना काही.
स्वप्नवत वाटावं असं
घडलंय सगळं.
तुझ्या आठवांच्या
कॅनव्हास वर
माझ्या भावनांचे
रंग आले उतरून.
मनासारखे
तुझ्या नि माझ्याही?
पण
घाई झाली
तुला सामावण्याची,
अन मला पुन्हा
समर्पणाची...
©रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment