Friday, 10 April 2020

सहज सुचलं म्हणून.... कन्यादान



              






खरे तर आपली भारतीय संस्कृती इतकी पुरातन आहे की त्याची पूर्ण ओळख व्हायला कितीतरी जन्म घ्यावे लागतील.
सोळा संस्कार आहेत त्यापैकी एक विवाह संस्कार सोहळा आणि ह्या सोहळ्यातील एक विधी आहे कन्यादान.
कन्या च का दान करावी मुलगा का नाही याच कारण स्त्री ही एक शक्ती आहे. ज्यावेळी शक्ती ची गरज असते त्यावेळी शक्ती आपल्याकडे चालत येते आपण नाही शक्तीकडे चालत जात.
म्हणून ही शक्ती शिवाकडे जाते. शिवशक्ती चे मिलन होत म्हणून ही जगरहाटी सुरु आहे.
दान महात्म्य काय आहे हे केल्याशिवाय कळत नाही.
नुसते लग्न लावणे म्हणजे मुलगी देणेच आहे न.
मग दान करणे का नाही. वस्तूचे तर दान कोणीही करू शकत. विश्वाच्या कल्याणासाठी, निर्मितीसाठी मुलगी देणें म्हणजेच दान करणे.
आणि शेवटी काय तर भावना आणि मन ह्या पण गोष्टी आहेतच. पूर्वी मुलींचे खूप लहान वयात लग्न व्हायची म्हणूनही कदाचित तिचा व्यवस्थित सांभाळ व्हावा, तिची जबाबदारी नीट घ्यावी  म्हणूनही  दान असेल कारण जोपर्यंत एखाद्या गोष्टीवरचा हक्क सोडत नाही म्हणजे त्यावर पाणी सोडत नाही तोपर्यंत मन त्यात अडकलं असत. आज जरी परिस्थिती बदलली असली तरी भावना त्याच आहेत. मन तेच आहे. आणि थोड्याफार फरकाने संस्कारही तेच आहेत.

रसिका

1 comment: