काहूरल्या सांजवेळी आकाशात चंद्रकोर चमकत होती. स्वतःच्या सौंदर्याचे शिंपण चहूकडे करत होती. चंद्राची कोर च ती सुंदर तर दिसेलच न!
पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जितका सुंदर दिसतो तितकीच ही प्रतिपदेची चंद्रकोर ही सुरेख.
लहानपणापासूनच या चंद्राशी नाळ जोडली जाते. कधी तो चांदोमामा होऊन सवंगडी होतो तर बीजेची कोर बहीण भावाचं प्रेमळ नातं सांगून जाते. तर कधी चवथीच्या चंद्राची कोर बनून स्त्री सौंदर्याला आव्हान देत येतो. कधी चौदहवी का चांद बनून प्रियकराला बेधुंद करतो तर पुनवेचा चांदवा होऊन प्रेमात बेभान होतो. करवा चौथ ला खूप वाट पहायला लावतो पण अतूट बंधन अधिकच दृढ करत जातो आणि संकष्टीला गणरायाच्या चरणी नतमस्तक होत भक्तिभाव जागवत येतो. शारदीय चांदण्यात कोजागिरीच्या दुधाळ प्रकाशात आरोग्याचं आंदण देतो. वृद्धत्वाला सलाम करण्यासाठी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळयाचा साक्षीदार होऊन कृतार्थतेचे,परिपूर्णतेचे दान घेऊन येतो.
एखाद्या सौंदर्यवतीने काळी चंद्रकला(म्हणजे पांढऱ्या खडीची पैठणी) परिधान करणे म्हणजे काळ्याभोर आकाशात चांदण्यांच्या सहवासात पूर्ण चंद्र असणे असे म्हणतात.
असा हा चंद्र एकच पण त्याच्या कला आपल्या जन्मापासून आपल्याशी निगडित आहेत. प्रत्येक आनंद क्षणाचा तो साथीदार आहे तसाच विरहातल्या रागिणीचा तोच साथीदार आहे.
रसिका
(सहज सुचलं म्हणून)

No comments:
Post a Comment