काळजी नको करूस बाळा साद आली स्वामी
वेदना ती मम हृदयाची हो कशी कळे निजधामी
आर्तता, अर्थार्थी, जिज्ञासू न ध्याती वीण काजा
स्मर्तृगामी ब्रीद राखीसी तू एक दत्त राजा
धावत येता भक्तजनांसी सांभाळाया नाथा
वात्सल्याने अंकी बसवून जोजविता गुरुनाथाव्यथेतून का जन्म होतसे नाम जपाचा अवधूता
म्हणुनी वदली पृथा माधवा दुःख दे यदुसूता
आवर सावर माया सारी ओठी येउ दे नाम
प्रल्हादासम अंत:करणी साठवू दे तव नाम
गुरुनाथाच्या कृपा सावलीत कोण करेल बाधा
सारे विसरुन व्हावी दत्ता गुरुनामाची बाधा
रसिका राजीव हिंगे
05.03.2023


No comments:
Post a Comment