Friday, 28 October 2016

दिवाळी शुभेच्छा

दिव्य तेजाने झळाळत,अंधाराचा, अज्ञानाचा पराजय करून
दीवाळी  आली  आहे.

निरामय आरोग्याची भेटघेऊन,
धन वर्षावण्यास धन्वंतरी सोबत
दिवाळी आली आहे.

सत्याचा असत्यावर विजय होतोच,
अन्यायाचे परिमार्जन कसे करावे
हे पटविण्यासाठी
नरकचतुर्दशी चे गुज कानी सांगत दिवाळी आली आहे .

सुख,समृद्धी, संपदा,
आणि  सदविचारांचे साज लेऊनी प्रसन्न वदना लक्ष्मी सह  
दिवाळी आली आहे.

नात्यांचे बंधन,
बंधनातील प्रेम,ममता,वात्सल्य
यांची उधळण करीत
पाडव्याचा गोडवा साथीला घेऊन दिवाळी आली आहे.

भावा बहिणीच्या अतूट नात्याची वीण अधिक घट्ट करीत
आणि दीपदानाचे तत्व सांगत दिवाळीचे आली आहे

अशा या मंगलमय दिवाळीचे स्वागत जल्लोषात,उत्साहात करण्यासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीच्या आगमनाने आपल्या सर्वांच्या मनातील इष्ट  इच्छा, आकांक्षा, पूर्ण होवो,
जे जे इष्ट इच्छिले मनी ते प्राप्त होवो हीच सदिच्छा

रसिका राजीव हिंगे

No comments:

Post a Comment