शाळा असावी शाळेसारखी
शाळा असावी शाळेसारखी नकोत नुसत्या इमारती
इथे असावे शिक्षक सगळे सांदीपनी समती
नकोच नुसती टक्केवारी अन विद्यार्थ्याची श्रीमंती
इथे असावा समभाव क्रुष्णासंगे सुदामाही घडती
ह्या शाळेतून विद्यार्थी घडावे घेण्यास उंच भरारी
आकाशास गवसणी घालून किर्ती जावी दिगंतरी
नकोच नुसते परीक्षार्थी विद्यार्थीच इथे घडावे
सुधाकराच्या शीतल प्रकाशी असेच नित्य घडावे.
-रसिका

No comments:
Post a Comment