बहुत जाहले अत्याचार अन ही हिंसा
का, कसे घडले नकोच कारणमिमांसा
सबला आहेस बाई तू नाहीस अबला
आत्मविश्वास वाढव सुभगे मनातला
हो सज्ज लढण्यास आता तू दुर्गेसमान
तूच वाढव तुझाच मान अन सन्मान
भिक नको घालूस पुरुषी अहंकाराला
आहे सक्षम तू आठव झाशीच्या राणीला
किरण बेदी हो, गुन्हेगारा कर शासन
प्राप्त होईलच तुजसी खरे उच्चासन
साक्षी,सिंधू सम लाव झेंडा अटकेपार
पुढेच टाक पाऊल नसे आता माघार
रणरागिणी तू,होणे नाही आता पारध
चिरडून टाक अन्याय, हो आता सावध
नष्ट होईल पुरुषी वर्चस्वाची विकृती
तूच योग्य सर्वथा रक्षण्यास ही संस्कृती
रसिका राजीव हिंगे
rasikahinge@gmail.com
No comments:
Post a Comment