Monday, 23 January 2017

शब्दांवाचून कळते सारे

                                                    
शब्दांवाचून  कळते सारे       
शब्दांच्या पलीकडले 
नयनांतून चाहूल  घेत 
जाणवे  सगळे अंतर्मनातले 

आठवणी येतात  कधी 
सुखावून जाण्यासाठी 
आठवणी येतात कधी 
मनमोर फुलविण्यासाठी 


आठवणी येतात कधी 
चांदण झुला  घेऊन 
आठवणी  येतात कधी 
प्रीतीचा  चांदवा घेऊन


 आठवणी येतात कधी 
चातक होऊन 
वाट  बघतांना 
बरसणाऱ्या सरी  होऊन 


आठवणींना घालू दे  थैमान 
स्वभावच आहे तो त्यांचा 
त्यामुळे त्या कधीही 
होत नाहीत बेईमान 



No comments:

Post a Comment