Wednesday, 18 February 2026

  आनंदाचे डोही 


अर्थ स्वरूपाचा 


स्वप्न नगरीत सापडेल का डोह वाहता आनंदाचा

फिरुनी येऊ गंधर्व नगर दिसेल का मज गाव सुखाचा


जिकडे तिकडे आरसपाणी सौंदर्यांची मुक्त उधळण 

परी कळेना भय कोणाचे श्रद्धेचेही दिसे विस्मरण


होते नांदत काम क्रोध मोह तिथे सर्वत्र  मिळून सारे 

माझे माझे मी पणाचेच उभारलेले उंच मनोरे


विसरुन सारे धावत सुटले ओळखीचे न दिसले मजला

हताश होउनि पाहू लागले चहुकडे ग ज्याला त्याला


अकस्मात मग धावत आले श्रीगुरु मज भेटायासी

बाळे कुठे भरकटली तू आलीस काय बघावयासी 


जग हे सारे मिथ्या आहे ध्यास घेइ तू नित्यत्वाचा

तुझ्या अंतरी भरला बाळा डोह खळाळत आनंदाचा


काय कळेना श्रीगुरुराया तूच आधार या जगताचा

सान लेकरू तुमचे नाथा अर्थ कळू दे या स्वरुपाचा 


रसिका राजीव हिंगे 




No comments:

Post a Comment