शब्दफुलांना वेचित बसते
मम हृदयाची दौत लेखणी
भान नच परी तिला कशाचे
ओसंडली ग परडी भरुनी
माझेच मला सांगत येते
गुज मनातले हळूच कानी
अन अल्लडशा बाल्या समती
फुरंगटूनी बसते रुसुनी
स्वातंत्र्याच्या समारांगणी
चल गाऊ या अता वीरश्री
अश्वावरती दौडत दौडत
येतांना ती भासे यशश्री
रसिका राजीव हिंगे

No comments:
Post a Comment