Tuesday, 14 February 2017

शब्द

शब्द  असावेत  असे
जणू समुद्राची  गाज
मनास शांत वाटावे
पाहुनी  शब्दांचा  साज

शब्दांनी घ्यावी सागराची गंभीरता
तर कधी व्हावे प्रशांत
कधी वाऱ्यासम उधळावेत
तर कधी झुळकेसम शांत

शब्दांनी घ्यावी नभाची विशालता
तर कधी व्हावी छाया
शब्द शब्दच असावेत ग
मनापासून करण्यास माया

शब्दांवाचून कळते सारे
शब्दांच्या पलीकडले
नयनातून चाहूल घेत
जाणवे सगळे अंतर्मनातले

प्रेमाची भाषा फक्त
नजरेलाच कळते
शब्दांची गरजच काय ग
जेव्हा नजरेला नजर मिळते 

No comments:

Post a Comment