श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
श्री गणेशाय नम:
। पुष्पदन्त उवाच
।
महिम्नः पारं ते
परमविदुषो यद्यसदृशी।
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि
तदवसन्नास्त्वयि गिरः।।
अथाऽवाच्यः सर्वः स्वमतिपरिणामावधि
गृणन्।
ममाप्येष स्तोत्रे हर निरपवादः
परिकरः।। १।।
श्री गणेशाला वंदन करून
पुष्पदंत म्हणे.. परमेशा,
विद्वान आणि योगीजन..
यांना तुझा महिमा
कळत नसेल...
मी तर एक
सान लेकरू आहे..
तुझ्याशिवाय तुझा महिमा
कसा कळेल!
माझा विश्वासच नाही शंकरा...
स्तवन होऊ शकत
नाही.. मग ब्रह्मादी
यांनी केलेले स्तवन
योग्य नाही का?
जसा भाव तसा
देव पुजला जातो..
अधिकार आहे तो
प्रत्येकाचा...तू तर
भोळा आहेस! माझे
स्तवन स्वीकारा...
भोलेनाथा..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
अतीतः पंथानं तव
च महिमा वाङ्मनसयोः
रतद्व्यावृत्त्या
यं चकितमभिधत्ते श्रुतिरपि
स कस्य स्तोतव्यः
कतिविधगुणः कस्य विषयः
पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य
न वचः ll 2ll
नच थांग लागे
तव स्वरूपाचा
परी सगुण साकार
गुण गाती मन
वाचा
हे महादेवा, तुम्ही कसे
आहात..
तुमचा महिमा मन
आणि शब्दाने
सांगणे..कठीण आहे..
अपौरुषेय
वेद सुद्धा नेती
नेती म्हणत शांत
झाले
तिथे..मी अज्ञानी
कसे सांगू?..पण
महेशा
तुम्ही सगुण साकार
रूप धारण..
करतात..त्यावेळी तुमच्या भक्तांना
मन
आणि वाचा यांनी
किती वर्णन करू
असे होते... भक्तांशिवाय कोण
करू
शकेल तुमचे रुप
गुण वर्णन!...
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
मधुस्फीता वाचः परमममृतं
निर्मितवतस्।
तव ब्रह्मन् किं वागपि
सुरगुरोर्विस्मयपदम्।।
मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन
भवतः।
पुनामीत्यर्थेऽस्मिन्
पुरमथन बुद्धिर्व्यवसिता।। ३।।
अमृत तुल्य वाणी
वेद विद्येचा निर्माता
हे सदाशिवा ईश्वरा
तूच आधार या
जगता
मधुर आणि तेजोमय
अशा
अमृततुल्य.. वेद वाणी
निर्माण
करणाऱ्या ब्रह्म रुपी
ईश्वरा...
देवगुरू बृहस्पतीने तुझे स्तवन
केले.. तर आश्चर्यकारक
वाटेल
का?हे त्रिपुरनाशना
तुझ्या गुण
स्तवनाच्या पुण्याने माझी वाणी..
पावन व्हावी म्हणून
मी हे स्तवन
मांडले जे शुध्द
हेतूने केले आहे.
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
तवैश्वर्यं यत्तज्जगदुदयरक्षाप्रलयकृत्।
त्रयीवस्तु व्यस्तं तिस्रुषु गुणभिन्नासु
तनुषु।।
अभव्यानामस्मिन्
वरद रमणीयामरमणीं।
विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके
जडधियः।। ४।।
गौरीहरा कृपनिधये
सृजन,पालक, संहारका
त्रिगुणात्मक
स्वरुपा
ऐश्वर्यवंत त्रिपुरांतका
हे वरदायक विश्वेश्वराय..तू
विश्वाचे सृजन,पालन,
संहार..
करतो असे वेदांमध्ये
सांगितले
आहे..तुझे हे
ऐश्वर्य किती सांगू..
सत्व,रज,तम
या तीन गुणांचे...
ब्रह्मा,विष्णू,महेश
या रुपात
तुझे दिसणारे मनमोहक रूप...
पण मंद बुध्दी
अज्ञानी..
उगाचच निरर्थक क्षोभ करतात..
त्याने वास्तव बदलणार
नाही...
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
किमीहः किंकायः स खलु
किमुपायस्त्रिभुवनं।
किमाधारो धाता सृजति
किमुपादान इति च।।
अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसर
दुःस्थो हतधियः।
कुतर्कोऽयं कांश्चित्
मुखरयति मोहाय जगतः।। ५।।
जगत कैसे निर्मिले
अज्ञजन का वदती
साधन आधार कोण
का ते सृष्टीस मोहविती
हे त्रिलोकेशाय..मंद
बुध्दीचे
अज्ञ काय बडबड करतात!..
ईश्वराने त्रैलोक्य कसे
निर्माण केले?
कोणत्या रूपात, कोणती
क्रिया..
शरीर कोणते.. खरोखरच
साधन
काय?आधार काय? पदार्थ
कोणते?
पण हे सगळे प्रश्न तुझ्या
बाबतीत.. कसे
शक्य आहे? तुझे ऐश्वर्य
अतर्क्य आहे..
तुझे माहात्म्य तर्काने
कळणारे नाही..
फक्त भ्रम निर्माण करण्यासाठी
अज्ञानी
ही मोहमयी बडबड करतात...कल्पनेच्या
पल्याड, अशक्य ही शक्य
करणारा तू..
तुझ्यासाठी ही बडबड निष्फळ
आहे..
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
अजन्मानो लोकाः किमवयववन्तोऽपि
जगतां।
अधिष्ठातारं किं भवविधिरनादृत्य
भवति।।
अनीशो वा कुर्याद् भुवनजनने
कः परिकरो।
यतो मन्दास्त्वां प्रत्यमरवर
संशेरत इमे।। ६।।
जग निर्मिती कैसी झाली
कुतर्क कसे हे व्यर्थं
आहे
तव सामर्थ्य का नकळे
मंदबुद्धी हे अज्ञानी
आहे
हे सर्वज्ञ ईश्वरा...या
अज्ञानी..
मुढ लोकांना किती प्रश्न
पडतात...
तुझ्या सामर्थ्यावर..तुझ्या
अस्तित्वावरच.. संशय
घेतात..
सर्व अवयवांनी युक्त
असलेले हे..
जन्मलेच नाही का? या
जगाची..
चौदा भुवनांची उत्पत्ती..अधिष्ठानाशिवाय
शक्य आहे का? तुझे अस्तित्व
नाकारले
तर.. विश्व निर्मितीचे
धाडस कोण करेल
बरे!... या मंद बुध्दीच्या
लोकांना
कळत नाही का हे?...
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
त्रयी सांख्यं योगः पशुपतिमतं
वैष्णवमिति।
प्रभिन्ने प्रस्थाने
परमिदमदः पथ्यमिति च।।
रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल
नानापथजुषां।
नृणामेको गम्यस्त्वमसि
पयसामर्णव इव।। ७।।
वेगवेगळी मते असती
चरणी शोधती आसरा
अवघड मार्ग वा सुकर
भक्त ध्याती तुलाच शंकरा
हे अनेकात्मका.. वेद,
सांख्य शास्त्र,
योगशास्त्र, शिवमत, वैष्णव
मत..
असे वेगवेगळे मार्ग आहेत..ज्याला
जो मार्ग रुचेल..भावतो
तोच मार्ग..
मग तो कठीण, बरा वाईट
असला
तरी त्या मार्गाने तुला
मिळतात..जशा
सगळ्या नद्या वेगवेगळ्या
मार्गांनी..
समुद्राला मिळतात..तसेच
तुझे भक्त
तुझ्या चरणी स्थिरावतात..तूच
त्यांचे..
प्राप्तव्य आहेस..
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
महोक्षः खट्वांगं परशुरजिनं
भस्म फणिनः।
कपालं चेतीयत्तव वरद
तन्त्रोपकरणम्।।
सुरास्तां तामृद्धिं
दधति तु भवद्भूप्रणिहितां।
न हि स्वात्मारामं विषय
मृगतृष्णा भ्रमयति।। ८।।
ऐश्वर्यवंत सुरगण होती
असे वरदान तव महेश्वरा
आत्मानंदी लीन अससी
सगुण स्वरुपा गिरिजावरा
हे सर्वज्ञा.. तुझे वैभव
ते काय?..
तर तुझे वाहन नंदी..
खटवांग..कुऱ्हाड..
व्याघ्रचर्म.. चिताभस्म..साप..
नाग..
नर कपाल ही साधन सामग्री..
तुझ्या कृपेने देव सुख
समृध्दी.. ऐश्वर्य..
मिळवतात..सामर्थ्य प्राप्त
करतात..
पण हे परशूहस्ताय.. तू
वैभवात..
राहत नाहीस.. कारण..
आत्मानंदात
रमलेल्या तुला विषय वासनेचे
मृगजळ..
मोह घालू शकत नाही...हे
वैराग्यवंता..
षड रिपुंच्या पल्याड
आहेस तू...
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
ध्रुवं कश्चित् सर्वं
सकलमपरस्त्वध्रुवमिदं।
परो ध्रौव्याऽध्रौव्ये
जगति गदति व्यस्तविषये।।
समस्तेऽप्येतस्मिन् पुरमथन
तैर्विस्मित इव।
स्तुवन् जिह्रेमि त्वां
न खलु ननु धृष्टा मुखरता।। ९।।
जगत मिथ्या अविनाशी
असे विनाशी कुणा भासे
परी स्तवन तुझे मांडले
नसे मिथ्या नच आभासे
हे भक्तवत्सला..काही
म्हणतात..
हे सगळे दृश्य जगत..शाश्वत..अविनाशी
आहे..मिथ्या..आहे..तर
काही म्हणतात
की क्षणभंगुर आहे..
अशी मतमतांतरे असली तरी..
मला गंमत वाटते अन्..
मी ही तुमची स्तुती करायला..
लाजत नाही..
हे त्रिपुरनाशना.. विद्वानांची
मते..
आणि मी केलेली तुमची
स्तुती...
तुमच्या दृष्टीने वाचाळता
आहे..पण
तुमची स्तुती करायची
तर धीटपणा
लागतोच...
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
तवैश्वर्यं यत्नाद् यदुपरि
विरिंचिर्हरिरधः।
परिच्छेतुं यातावनिलमनलस्कन्धवपुषः।।
ततो भक्तिश्रद्धा-भरगुरु-गृणद्भ्यां
गिरिश यत्।
स्वयं तस्थे ताभ्यां
तव किमनुवृत्तिर्न फलति।। १०।।
तमोगुणांचा ईश प्रखर
अग्नीरुप
तव ऐश्वर्याचा थांग आकळेना
श्रध्दा भक्तिभावे तुला
शरण शरण
कैसा तव महिमा परिमाण
कळेना
कोण श्रेष्ठ आहे असा..
ब्रह्मा आणि श्रीहरी..यांच्यात
वाद
झाला.. तेव्हा तेज:पुंज
अग्नीस्तंभ..
रुप घेऊन..त्या दोघांच्या
मध्ये..
तुम्ही उभा राहिलात..तुमचे
ऐश्वर्य..महिमा
मोजण्यासाठी..अग्निस्तंभाचा
आरंभ पाहण्यासाठी..ब्रह्मदेव
वर सत्य
लोका पर्यंत..तर अंत
पाहण्यासाठी
विष्णू खाली पाताळात
गेले..पण त्यांना
तुमचा थांगपत्ता लागला
नाही..तुमच्या..
ऐश्वर्याचे परिमाण ठरवता
आले नाही..
ब्रह्मा विष्णू,.तुम्हाला
भक्तीभावाने..
श्रद्धापूर्वक शरण आले..तेव्हा
तुम्ही
त्यांच्यासमोर प्रगट
झालात..
खरचं आपली सेवा कोणतं
फळ देणार
नाही?
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
अयत्नादापाद्य
त्रिभुवनमवैरव्यतिकरं।
दशास्यो यद्बाहूनभृत-रणकण्डू-परवशान्।।
शिरःपद्मश्रेणी-रचितचरणाम्भोरुह-बलेः।
स्थिरायास्त्वद्भक्तेस्त्रिपुरहर
विस्फूर्जितमिदम्।। ११।।
सामर्थ्य संपन्न असे
लंकाधीश
परि नच सायासे
हा त्रिभुवनपती
निस्सीम भक्ती श्रद्धा
तव चरणी
शिरकमल अर्पिले तुझ कैलासपती
हे त्रिपुरहरा..रावण हा पराक्रमी..
युद्ध करण्याची..सूड उगविण्याची..
प्रबळ इच्छा..असताना..प्रयत्न..
न करता.. निर्वैर..त्रिभुवनाचे राज्य मिळाले..
रणांगणात..न जाता
त्याचे हाताचे..
सामर्थ्य वाढले..ते
केवळ तुमच्या
वरदानामुळे..तुझ्यावर अपरंपार भक्ती
असलेल्या.. दशाननाने.. तुझ्या चरणावर
कमलपुष्पा ऐवजी स्वतः
चे..शिर कमल
अर्पण केले..हे
भकतवत्सला..
कशाच्या बळावर? हा
तुझ्या भक्तीचाच
महिमा नव्हे काय?
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
अमुष्य त्वत्सेवा-समधिगतसारं
भुजवनं।
बलात् कैलासेऽपि त्वदधिवसतौ
विक्रमयतः।।
अलभ्यापातालेऽप्यलसचलितांगुष्ठशिरसि।
प्रतिष्ठा त्वय्यासीद् ध्रुवमुपचितो
मुह्यति खलः।। १२।।
आव्हान देत तुज युद्धाचे
भक्त रावण ज्ञानसंपन्न
ऐश्वर्य मिळे खल वृत्तीसी
कृतघ्न होती सामर्थ्यसंपन्न
हे गिरीप्रियाय..रावणाने तुमची
सेवा
केली..त्यामुळे त्याच्या हातात
सामर्थ्य..
शक्ती..निर्माण झाली..पण त्याच
हाताने..
बळाने तुमचे वसतीस्थान कैलास
पर्वत..
उपटून नेण्याचा त्याने प्रयत्न
केला..
हे सांब सदाशिवा..तुम्ही सहज
पायाच्या
अंगठ्याच्या टोकाने पर्वतावर
दाब दिला..
रावणाचा हात त्याखाली दबल्यामुळे..
पाताळात गेलेल्या दशाननास
तिथे उभे..
राहणे महाकठीण झाले...तुमच्या
सामर्थ्याची जाणीव झाली..अन्
भक्ती
शिवतांडव स्तोत्राद्वारे प्रगट
झाली...जर
दुष्टाला ऐश्वर्य मिळाले तर
त्याचा काय
परिणाम होतो..तो आपला विवेक
हरवून
बसतो.. कृतघ्न होतो...
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
यदृद्धिं सुत्राम्णो वरद परमोच्चैरपि
सतीं।
अधश्चक्रे बाणः परिजनविधेयत्रिभुवनः।।
न तच्चित्रं तस्मिन् वरिवसितरि
त्वच्चरणयोः।
न कस्याप्युन्नत्यै भवति शिरसस्त्वय्यवनतिः।।
१३।।
सुर असो वा असुर
येईल तव पदा
कृपावंत देवा
रक्षण करी सदा
हे वरदायका महादेवा..तुमच्या
चरणांचा..महिमा काय सांगावा...
बलीचा मुलगा.. बाणासुराने..
त्रिभुवनाला.. त्रैलोक्याच्या..
अधीन केले.. इंद्राच्या असीम
संपत्तीचे..हरण केले...तुमच्या
चरणाची सेवा करणाऱ्या..
बाणासुरास हे सामर्थ्य प्राप्त
झाले..
यात आश्चर्यकारक असे काहीच
नाही...
तुमच्या चरणी नतमस्तक असणाऱ्या
भक्तांची..उन्नती कशी होणार
नाही?...
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
अकाण्ड-ब्रह्माण्ड-क्षयचकित-देवासुरकृपा-
विधेयस्याऽऽसीद् यस्त्रिनयन
विषं संहृतवतः।।
स कल्माषः कण्ठे तव न कुरुते
न श्रियमहो।
विकारोऽपि श्लाघ्यो भुवन-भय-भंग-व्यसनिनः।।
१४।।
वंदन तुजसी हे परमेशा
नीलकंठाय सहस्र अक्षाय
कैसा विकार कैसे कालकुट
ही माया की काय गिरिशाय?
देव आणि दानव..यांनी समुद्रमंथन
केले.. त्यातून हलाहल..कालकुट..
विष निघाले..अचानक ब्रह्मांडाचा..
विध्वंस होईल की काय अशी भीती..
देव दानवांना वाटली.. हे त्रिनयना..
त्यांच्यावर कृपा करण्यासाठी..
तू हे विष प्राशन केलेस..परिणाम
तुझा कंठ निळा झाला..हा विकार
तुम्हाला कुरूप कसा करेल?..
जगाचे भय दूर करणाऱ्या
भवभयहारका..तुमचा हा विकार..
सुद्धा प्रशंसनीय आहे...
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
असिद्धार्था नैव क्वचिदपि
सदेवासुरनरे।
निवर्तन्ते नित्यं जगति जयिनो
यस्य विशिखाः।।
स पश्यन्नीश त्वामितरसुरसाधारणमभूत्।
स्मरः स्मर्तव्यात्मा न हि
वशिषु पथ्यः परिभवः।। १५।।
देव असो वा असू दे दानव
सामर्थ्य तुझे कोणा कळेना
जितेंद्रिय परी भोळा शंकर
लीला तुझी रे आकळेना
देव..दानव..मनुष्य कोणीही
असो..
मदनाचे नेहमी विजय मिळविणारे..
बाण कधीही निष्फळ झाले नाहीत...
पण याच मदनाने तुमची शक्ती..
ओळखली नाही..साधारण समजला..
तुम्हास..अन् तुमच्यावर..शरसंधान
साधले..आपण तर देवांचे
देव महादेव आहात..केवळ तुमच्या..
दृष्टीनेच तो भस्म झाला..तुमच्यासारख्या
जितेंद्रिय असणाऱ्यास विचलित..
करण्याचा..प्रयत्न कधीही हितकर
होत नाही..
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
मही पादाघाताद् व्रजति सहसा
संशयपदं।
पदं विष्णोर्भ्राम्यद् भुज-परिघ-रुग्ण-ग्रह-गणम्।।
मुहुर्द्यौर्दौस्थ्यं यात्यनिभृत-जटा-ताडित-तटा।
जगद्रक्षायै त्वं नटसि ननु
वामैव विभुता।। १६।।
व्याघ्रांबरधर हे फणीवरा
दीड दीड दा तांडव नर्तन
जग कल्याणा भक्तवत्सला
कैसी लीला कैसे अर्चन
हे जटाधराय..तुम्ही तांडव
नृत्य करता..
नृत्याच्या वेळी..तुमच्या
पायाच्या आघाताने..
हादरणारी पृथ्वी संशयात पडते..पाताळात
जाण्याच्या कल्पनेने घाबरते..अंतरीक्ष..
विष्णू पद व्याकूळ होतात..तुमचे
हात..
गरगर फिरल्यामुळे ग्रह..तारे..नक्षत्रे..
त्रासून..विखरतात..तुमच्या..मोकळ्या
जटांच्या..तडाख्याने स्वर्गलोक..
भयभीत होतो..जगाच्या कल्याणासाठी...
तुम्ही तांडव नृत्य करता..खरोखर..
तुमचे
प्रभुत्व..अनाकलनीय आहे..कैसी
प्रभो..
ही लीला..सगळचं मनोहारी..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
वियद्व्यापी तारा-गण-गुणित-फेनोद्गम-रुचिः।
प्रवाहो वारां यः पृषतलघुदृष्टः
शिरसि ते।।
जगद्द्वीपाकारं जलधिवलयं तेन
कृतमिति।
अनेनैवोन्नेयं धृतमहिम दिव्यं
तव वपुः।। १७।।
भगीरथ प्रयत्नांती मंदाकिनी
भूवरी
तप सामर्थ्य वर्णाया निःशब्द
ही वैखरी
सगर कुमारांचा करावयासी उद्धार
भक्तवत्सल कृपाळू होई सगुण
साकार
हे गंगाधराय..तुमच्या दिव्य..
शरीराचे सामर्थ्य किती असावे?..
स्वर्गातून येणाऱ्या..मंदाकिनीचा..
प्रवाह..साऱ्या आकाशाला..
व्यापून घेणारा.. ताऱ्यांमुळे
ज्याची
फेसाळता जास्त चमकदार दिसते..
असा.. तुमच्या शिरावर छोट्याशा..
बिंदू सारखा दिसतो..आपल्या
जटेतून..
वाहणाऱ्या याच प्रवाहाने समुद्रवलयांकित..
जग द्वीपाच्या आकाराचे बनविले..
हे रुद्राया..तुमच्या शरीराच्या
मोठेपणाचा..
अनन्य साधारण महिमा काय वर्णावा!..
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
रथः क्षोणी यन्ता शतधृतिरगेन्द्रो
धनुरथो।
रथांगे चन्द्रार्कौ रथ-चरण-पाणिः
शर इति।।
दिधक्षोस्ते कोऽयं त्रिपुरतृणमाडम्बर
विधिः।
विधेयैः क्रीडन्त्यो न खलु
परतन्त्राः प्रभुधियः।। १८।।
अनाकलनीय तुझे रूप
कैसी लीला कैसा खेळ
त्रिपुरांतका महेश्वरा
कैसा साधसी सारा मेळ
हे परमेश्वरा..कसा खेळ आहे..
तुझा
सगळा.. तृणवत त्रिपुरासुराचा
नाश..
करण्यासाठी..तू पृथ्वीचा रथ
केलास..
चंद्र सूर्य या रथाचे चाक
झाले..ब्रह्मदेव..
सारथी..आणि चक्रधर विष्णूचा
बाण..
केलास..खरोखर हा तुझा खेळ
आहे..
यांनी सगळ्यांनी..मदत केली
नसती..
तर तू त्रिपुरासुराला मारू
शकला नसता..
का?..इतका खटाटोप करण्याची
गरज..
का भासली?..खरेच तुझी बुध्दी
स्वतंत्र..
आहे..हे प्रभो तू कुठेही..कसाही..लीलया..
खेळ खेळू शकतो...
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
हरिस्ते साहस्रं कमल बलिमाधाय
पदयोः।
यदेकोने तस्मिन् निजमुदहरन्नेत्रकमलम्।।
गतो भक्त्युद्रेकः परिणतिमसौ चक्रवपुषः।
त्रयाणां रक्षायै त्रिपुरहर जागर्ति
जगताम्।। १९।।
काशीक्षेत्री
श्रीनारायण
मनकर्णिका तीरावरती
सांब सदाशिव प्रसन्न
झाले
पाही हरीची उत्कट
भक्ती
हे सांबशिवाय..किती अगम्य
लीला..
देवा..श्रीहरीची आपल्यावरील भक्ती..
अपरंपार..दानवांचा नाश करण्यासाठी..
श्रीहरी आपल्या चरणी
सहस्र कमल पुष्प..
अर्पण करत असताना..एक कमल
पुष्प..
कमी होते.. विष्णूच्या
भक्तीची परीक्षा..
घेतली महादेवा तुम्ही..किती
आणि कशा..
लीला आहेत तुमच्या..
पण श्रीविष्णु..
तुमचेच भक्त.. पूर्णता
व्हावी म्हणून..
श्रीविष्णूने
स्वतः चे नेत्र
कमल अर्पण..
केले..उत्कट भक्ती
श्रीविष्णूची..याच..
भक्तीने सुदर्शन चक्राचे रुप
धारण केले..
जे विष्णूच्या हातात आहे.
हे सदाशिवाय
आपल्या..सेवेचे फलस्वरुप..हे सुदर्शन..
चक्र त्रैलोक्याचे रक्षणासाठी जागृत..
आहे..
रसिका राजीव हिंगे
क्रतौ सुप्ते जाग्रत्
त्वमसि फलयोगे क्रतुमतां।
क्व कर्म प्रध्वस्तं
फलति पुरुषाराधनमृते।।
अतस्त्वां सम्प्रेक्ष्य क्रतुषु फलदान-प्रतिभुवं।
श्रुतौ श्रद्धां बध्वा दृढपरिकरः
कर्मसु जनः।। २०।।
यज्ञ यागाचे फळ
प्रदान करी तात्काळ
तृप्त होती सकळ
तव कृपा ही
कंठनीळ
हे यज्ञमयाय..खरोखरच भक्तवत्सल..
भक्तांच्या कर्माचे..फळ देण्यास..
जागरूक असलेल्या शिव शंकरा..
यज्ञ संपल्यावर.. यज्ञ करणाऱ्यास..
याज्ञिकास त्याचे फळ
प्रदान करता..
यज्ञा मुळे कर्मनाश
झालेला..ईश्वराच्या
आराधनेशिवाय कर्म फलद्रूप
कसे होईल..
तुम्हीच भोलेनाथा..तुमच्यामुळेच.. वेद..
वचनांवर श्रद्धा ठेवून..लोक
निष्ठेने कर्म..
करण्यास प्रवृत्त होतात..सतत
तयार..
असतात....
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
क्रियादक्षो दक्षः क्रतुपतिरधीशस्तनुभृतां।
ऋषीणामार्त्विज्यं
शरणद सदस्याः सुर-गणाः।।
क्रतुभ्रंशस्त्वत्तः
क्रतुफल-विधान-व्यसनिनः।
ध्रुवं कर्तुं श्रद्धा
विधुरमभिचाराय हि मखाः।।
२१।।
अपमानिती शंकरा
क्रतुपती दक्षराज
विध्वंसला यज्ञयाग
महादेवे गिरिराज
हे गौरीहरा..तू तारणहार आहेस..
तसाच शासन पण
करणारा आहेस..
दक्ष प्रजापती..क्रिया,कर्मकांड
निपुण...
यज्ञ करण्यास श्रेष्ठ असा..त्याच्याजवळ..
त्रिकाल ऋषी.. सुरगण..देव..सगळेच..
होते..तुमचा अपमान
केला दक्षाने...सतीचा..
अपमान केला..यज्ञाचे
फळ देणारे तुम्ही..
त्याच्या यज्ञाचा..विध्वंस केला..खरोखर..
शासन केलेत... श्रद्धेशिवाय केलेला..यज्ञ..
यज्ञकर्त्यास
फलद्रूप कसा होईल?..
असे यज्ञ..त्याच्या
नाशाला..कारणीभूत..
होतात...
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
प्रजानाथं नाथ प्रसभमभिकं
स्वां दुहितरं।
गतं रोहिद् भूतां
रिरमयिषुमृष्यस्य वपुषा।।
धनुष्पाणेर्यातं
दिवमपि सपत्राकृतममु।
त्रसन्तं तेऽद्यापि त्यजति न
मृगव्याधरभसः।। २२।।
कैसा आणि का
घडला
अक्षम्य ऐसा अपराध
देवाधिदेवा रुद्राया
शासियेला कामनांध
हे नाथ.. सुष्टांचे
रक्षण..दुष्टांना शासन..
करणारे आहात...मानस
कन्येला..
पाहून प्रजापती ब्रह्मदेव कामुक
झाले..तेव्हा..
लज्जेने ती मृगाचे
रुप घेऊन..झाडामागे..
लपली..ब्रह्मदेवाने पण मृगाचे
रुप घेतले..
हे कृपानिधये आपण आपले
पिनाक धनुष्य..
हातात घेऊन..ब्रह्मदेवावर
पारध्या प्रमाणे..
बाण सोडले..ब्रह्मदेव
भयाने..घाबरून..
आकाशात पळाला..मृग
नक्षत्रात असलेल्या..
ब्रह्मदेवाचा..
आद्रा नक्षत्रात असलेला..मृगव्याध..
आपला बाण त्याचा
पाठलाग करीत आहे..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
स्वलावण्याशंसा
धृतधनुषमह्नाय तृणवत्।
पुरः प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन
पुष्पायुधमपि।।
यदि स्त्रैणं देवी यमनिरत-देहार्ध-घटनात्।
अवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतयः।।
२३।।
कधी कळेना आकळेना
शक्तिस्वरुप शिव जाया
लीला दाखवी की
भोळी
का श्रीहरी ची योगमाया
हे भोळ्यानाथा..स्त्रीचा स्वभाव..तुम्हाला..
उलगडला आहे का?
गौरीचे सौंदर्य..
ते पाहून कामदेवाने
तुम्हाला...
जिंकण्यासाठी..धनुष्य तुमच्यावर..
रोखण्याचा प्रयत्न केला..तेव्हा
गवतासारखे..
तुम्ही क्षणात कामदेवाला
भस्म केले..हे
पाहून..
सुद्धा..हे वैराग्यवंता..पार्वतीला तुमच्या अर्ध्या..
देहात धारण केलेस..अर्धनारीनटेश्वर..म्हणून
मिरवता..यामुळे पार्वती
तुम्हाला स्त्रीसक्ता..
मानत असेल तर
स्त्रिया भोळ्या असतात..
असेच मानावे लागले..
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
श्मशानेष्वाक्रीडा
स्मरहर पिशाचाः सहचराः।
चिता-भस्मालेपः स्रगपि नृकरोटी-परिकरः।।
अमंगल्यं शीलं तव
भवतु नामैवमखिलं।
तथापि स्मर्तॄणां वरद परमं
मंगलमसि।। २४।।
हे मंगलमय शिवशंकरा
नाम मंगल, मंगल
रुप
अमंगल कैसे तत्व
होई
निराकार निर्गुण अरुप
हे कामनाशना..सर्व सामान्यांना
जे अशुभ..
आहे अशा स्मशानात..आपण विहार..
करता..क्रीडा करता..तुमचे मित्र..सखे..
कोण तर..पिशाच्च..सर्वांगाला आपण..
चिताभस्माचे उटणे लावता..
नर कपाल..
मृत व्यक्तीच्या कवटीची..माळ
आपण..
गळ्यात घालता..हे
देवाधिदेवा..आपले..
हे आचरण सर्वसाधारणपणे
अमंगल आहे..
तरीही हे वरदायका..तुला स्मरणारे..तुझे..
भक्त.. मात्र तुझे
नाम परम मंगल
करणारे..
आहेत..
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
मनः प्रत्यक् चित्ते सविधमविधायात्त-मरुतः।
प्रहृष्यद्रोमाणः प्रमद-सलिलोत्संगति-दृशः।।
यदालोक्याह्लादं ह्रद इव निमज्यामृतमये।
दधत्यन्तस्तत्त्वं किमपि यमिनस्तत् किल भवान्।। २५।।
निर्गुण निराकार स्वरुपा
योगेश्वराय श्री महादेवा
निष्काम साधनेचे फळ
तव कृपेने लाभते देवा
हे त्रिलोकेशाय..योगीजन शास्त्रोक्त..
प्राणायाम..अष्टांग योग..साधना करतात..
चित्त..मन..विषयापासून परावृत्त करून..
हृदयकमलात स्थिर करतात..तेव्हा..
अतिशय आनंदाने..रोमांचित होऊन..
त्यांचे डोळ्यात आनंदाश्रू येतात..त्यावेळी..
झालेल्या ब्रह्मानंदाने जे तत्व स्वरूप त्यांना..
दिसते..ते पाहिल्यावर..अमृताच्या डोहात..
उडी मारल्यासारखे वाटते त्यांना..परमेश्वरा..
हे विलक्षण तत्व दर्शन..तूच आहेस..हे निर्गुण..
तत्व तूच आहेस..तूच आहेस..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
त्वमर्कस्त्वं सोमस्त्वमसि पवनस्त्वं हुतवहः।
त्वमापस्त्वं व्योम त्वमु धरणिरात्मा त्वमिति च।।
परिच्छिन्नामेवं त्वयि परिणता बिभ्रतु गिरं।
न विद्मस्तत्तत्त्वं वयमिह तु यत्वं न भवसि।। २६।।
चराचरात ठायीठायी
घनदाट तू विश्वनाथा
मर्यादेचे कुंपण तुजला
कैसे घालावे गौरीनाथा
हे जगद्व्यापिना..तू सूर्य..चंद्र..वायू..
अग्नी..आप..आकाश..पृथ्वी आहेस..
तसेच आत्मा सुद्धा तूच आहेस...म्हणजे..
पंचभुतांमध्ये तू सामावलेला आहेस..असे
विद्वतजन म्हणतात..हे अनंताय..तू खरेच..
इतका मर्यादित आहेस का? तुझे रूप असे..
मर्यादित कसे असेल देवा..आम्हाला तर..
या जगामध्ये एकही तत्व..वस्तू..ठिकाण..
असे नाही की तू तिथे नाहीस..सगळीकडे..
तू घनदाट..भरला आहेस..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
त्रयीं तिस्रो वृत्तीस्त्रिभुवनमथो त्रीनपि सुरान्।
अकाराद्यैर्वर्णैस्त्रिभिरभिदधत् तीर्णविकृति।।
तुरीयं ते धाम ध्वनिभिरवरुन्धानमणुभिः।
समस्त-व्यस्तं त्वां शरणद गृणात्योमिति पदम्।। २७।।
शंभूदेवा त्रिलोकनाथा
ब्रम्हांडनायक चराचरी तू
ओमकाराचा अनाहत नाद
ज्ञानदायक विश्वनाथ तू
हे विश्वेश्वराय...तीन वेद म्हणजे ऋग्वेद..यजुर्वेद..
साम..तीन वृत्ती म्हणजे जागृती..स्वप्न.. सुषुप्ती..
तिन्ही लोक..स्वर्ग..मृत्यू..पाताळ..आणि तिन्ही..
देव..ब्रह्मा..विष्णू..महेश.. या सगळ्यांना..
अकार..उकार..मकार..या तीन वर्णांनी बोध..
करणारे..सर्व विकारांच्या..पल्याड असणारे..
तुमच्या तुरीय..चवथ्या वृत्तीच्या परम पदाचे..
सूक्ष्म ध्वनीनी..जागृत करणारे..ओम हे तुमचे..
पद.. व्यापकपणाचे आणि अवताराचे..
तुमचेच वर्णन करणारे आहे..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
भवः शर्वो रुद्रः पशुपतिरथोग्रः सहमहान्।
तथा भीमेशानाविति यदभिधानाष्टकमिदम्।।
अमुष्मिन् प्रत्येकं प्रविचरति देव श्रुतिरपि।
प्रियायास्मैधाम्ने प्रणिहित-नमस्योऽस्मि भवते।। २८।।
तेजोमय स्वरुपा
नमन नमन तुजला
विश्वेश्वराय निर्गुणा
त्रिवार वंदन तुजला
हे शंकरा..भव म्हणजे संसाररुपी..
शर्वो..कष्ट नाश करणारे..रुद्र..भयानक..
पशुपति नाथ..पशूंचे स्वामी..
अत्यंत उग्र स्वरूप..देवांचे देव महादेव..
भीम..भयानक रूप असणारे..
ईशान..सर्व नियामक..अशी ही आपली..
आठ नावे..यातील प्रत्येक नाव..
स्वयंप्रकाशित..परमप्रिय असे आहे..
हे रुद्राय.. वेद सुद्धा याचे चिंतन करतात..
ओमकाराप्रमाने वेदमंत्र प्रवृत करणारे,.
या आठ..नावाचा विचारही न करता..
हे शंभू..तेजस्वी..मला आवडणाऱ्या..
तुमच्या या..रूपाला मी नमस्कार करतो..
वंदन करतो...
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
नमो नेदिष्ठाय प्रियदव दविष्ठाय च नमः।
नमः क्षोदिष्ठाय स्मरहर महिष्ठाय च नमः।।
नमो वर्षिष्ठाय त्रिनयन यविष्ठाय च नमः।
नमः सर्वस्मै ते तदिदमतिसर्वाय च नमः।। २९।।
नमन तुजसी महेश्वरा
वंदन तुज ब्रह्म स्वरुपा
नमस्कार तुला हे अनंताय
त्रिवार वंदन अरुप रुपा
हे निर्जन वन प्रिय..अत्यंत जवळ..
अत्यंत दूर..असणाऱ्या शिवा तुला..
नमन असो..हे मदनांतका..अति सूक्ष्म..
आणि अति महान असणाऱ्या..तुला..
वंदन करतो..हे त्रिलोचना..वृध्द..अतिप्राचीन..
अति तरुण..असणाऱ्या शंकरा..तुला..
नमस्कार करतो..हे सर्व स्वरुपी..प्रत्यक्ष..
अप्रत्यक्ष असणाऱ्या..तुला नमन असो..
हे ब्रह्म स्वरुपा महेशा..तुला त्रिवार,.
नमस्कार असो...
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
बहुल-रजसे विश्वोत्पत्तौ, भवाय नमो नमः।
प्रबल-तमसे तत् संहारे, हराय नमो नमः।।
जन-सुखकृते सत्त्वोद्रिक्तौ, मृडाय नमो नमः।
प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये, शिवाय नमो नमः।। ३०।।
हे विश्व निर्मिका नमो नम:
हे संहार हायका नमो नम:
हे सुखदायका नमो नम:
मंगलमय स्वरुपा नमो नम:
हे विश्वरुपा.. विश्वाच्या उत्पत्तीच्या..
वेळेस रजोगुण प्रधान..ब्रह्मस्वरूपा..
भव..रूपाला नमस्कार असो..
विश्वाच्या संहाराच्या वेळी तमोगुण..
प्रबळ झालेल्या रुद्र स्वरूप..हराला..
महादेवाला नमस्कार असो..लोकांना..
सुख देण्यासाठी..सत्वगुण धारण..
करणाऱ्या.. विष्णूरुप..मृडा ला..नमस्कार..
असो.. त्रिगुणातीत निर्गुण.. ब्रह्माला..
शिव स्वरूपाला..पुन्हा पुन्हा नमस्कार..
असो..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
कृश-परिणति-चेतः क्लेशवश्यं क्व चेदं।
क्व च तव गुण-सीमोल्लंघिनी शश्वदृद्धिः।।
इति चकितममन्दीकृत्य मां भक्तिराधाद्।
वरद चरणयोस्ते वाक्य-पुष्पोपहारम्।। ३१।।
फेरा षड रिपुंचा कळेना
आकळेना अविद्या माया
भावफुले ही स्वीकारावी
हीच प्रार्थना शंभुराया
हे वरदायका..अति प्रयत्नाने माझ्या..
चंचल मनाला लगाम घातले..
अविद्येमुळे क्लेश भोगणारे..माझे मन..
आहे..गुणांची परिसीमा ओलांडणारी..
तुझी शाश्वत समृध्दी..आहे. या विचाराने..
विरोधाभासामुळे..आश्चर्यचकित झालेला..
मी..भक्तीने प्रोत्साहित होऊन..माझ्या..
शब्द फुलांचा नजराणा..तुमच्या चरणी..
समर्पित करीत आहे..जो तुम्हीच..माझ्या..
कडून तयार करून घेतलेला आहे...
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
असित-गिरि-समं स्यात् कज्जलं सिन्धु-पात्रे।
सुर-तरुवर-शाखा लेखनी पत्रमुर्वी।।
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं।
तदपि तव गुणानामीश पारं न याति।। ३२।।
गुण तुझे अमर्याद
कैसे पुजावे नि स्मरावे
नाम तुझे परम मंगल
कैसे गावे कैसे ध्यावे
हे ईश्वरा..समुद्राच्या पाण्यामध्ये..काळया,.
पर्वतासारखे काजळ..घालून..शाई तयार..
केली..लिहिण्यासाठी कागद म्हणून पृथ्वी..
घेतली..प्रत्यक्ष विद्येची देवता..सरस्वती..
सर्वकाळ लिहीत..बसली तरी..
हे ब्रह्मांड नायका..तुझ्या गुण वर्णनाचा..
पार.. कधी लागणार नाही..तुझ्या गुणांचा..
पैलतीर..गाठता येणार नाही..तुझ्या लीला
कळणार नाही...
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
असुर-सुर-मुनीन्द्रैरर्चितस्येन्दु-मौलेः।
ग्रथित-गुणमहिम्नो निर्गुणस्येश्वरस्य।।
सकल-गण-वरिष्ठः पुष्पदन्ताभिधानः।
रुचिरमलघुवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार।। ३३।।
निर्गुण निराकार शंकरा
पुजीती असुर सुर मुनी
श्रेष्ठ गण तुझ स्तवितो
रची वृत्त सुंदर शिखरिणी
असुर..देव..मुनी..ऋषी..यांनी.. शिरावर
चंद्र धारण करणाऱ्या..चंद्रमौळी..निर्गुण..
निराकार रुपाची उपासना..केली....
अशा या शंकराच्या गणांमध्ये..श्रेष्ठ..पुष्पदंत..
गंधर्वाने अतिशय सुंदर असे अनादी..अनंत..
शिवाचे..स्तुतीपर शिवमहिम्न स्तोत्र..
शिखरिणी नावाच्या दीर्घ वृत्तात रचले आहे..
जे सर्व शिवभक्तांना अतिशय प्रिय आहे...
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
अहरहरनवद्यं धूर्जटेः स्तोत्रमेतत्।
पठति परमभक्त्या शुद्ध-चित्तः पुमान् यः।।
स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथाऽत्र।
प्रचुरतर-धनायुः पुत्रवान् कीर्तिमांश्च।। ३४।।
निष्काम उपासनेचे फळ
प्राप्त होई स्तोत्र पठणे
भावपूर्ण भक्ती श्रध्दा
गायन शुध्द अंत:करणे
शिवमहिम्न..स्तोत्र पठण केल्याने..काय..
फळ मिळेल?..हे सांगताना पुष्पदंत म्हणतात..
जो हे स्तोत्र शुध्द अंत: करणाने..परम भक्तीने..
नित्य पठण करतो..त्याला..इहलोकी..संपत्ती..
दीर्घ आयुष्य..पुत्र पौत्र..कीर्ती लाभते..मृत्युनंतर..
शिवलोकी..रुद्र स्वरूप..होऊन मुक्त होतो..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
महेशान्नापरो देवो महिम्नो नापरा स्तुतिः।
अघोरान्नापरो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम्।। ३५।।
दीक्षा दानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकाः क्रियाः।
महिम्नस्तव पाठस्य कलां नार्हन्ति षोडशीम्।। ३६।।
गुरुतत्वाहूनी श्रेष्ठ
नसे अन्य काही
ब्रह्म रूपाचे ज्ञान
गुरुविण नाही
तपे तीर्थ दाने यज्ञ
असे अल्पसे फळ
तव महिमा गाता
मिळे शाश्वत फळ
महादेव..शंकरापेक्षा.. मोठा कोणता..
देव नाही..शिवमहिम्न..स्तोत्रपेक्षा श्रेष्ठ
कोणते.. स्तोत्र नाही.. अघोर मंत्राहून..
श्रेष्ठ..सरस..कोणता मंत्र नाही..आणि..
गुरू पेक्षा कोणते मोठे तत्व नाही... शिव..
स्वतः.. गुरू असल्यामुळे त्यांच्यापेक्षा..
श्रेष्ठ कोणीच..नाही..
मंत्राची दीक्षा घेणे..तीर्थयात्रा..ज्ञान..
यज्ञ यागादी क्रिया.. दाने यापेक्षाही..
तुझ्या या महिम्याचे..पठण..चिंतन..
मनन..केले तर या..सगळ्या गोष्टी..या
महिम्याच्या सोळाव्या हिश्याची तुलना..
करण्यास योग्य नाहीत...
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
कुसुमदशन-नामा सर्व-गन्धर्व-राजः।
शशिधरवर-मौलेर्देवदेवस्य दासः।।
स खलु निज-महिम्नो भ्रष्ट एवास्य रोषात्।
स्तवनमिदमकार्षीद् दिव्य-दिव्यं महिम्नः।। ३७।।
स्तोत्र ऐसे रचियेले
जे सौख्यचे धाम
भोळा देव प्रसन्न
घेता श्रध्देने नाम
कुसुमदशन..ज्याचे पुष्पासारखे दात..आहेत..
असा पुष्पदंत..सर्व गंधर्वांचा..राजा असलेला..
बालचंद्र ज्याने शिरावर धारण केलेला आहे असा
देवांचा देव महादेव..शंकर यांचा दास असलेला..
शंकराच्या कोपामुळे.. स्वतःच्या उच्च पदापासून..
पदच्युत झाला..स्वतः चे वैभव गमावले..ते
प्राप्त करण्यासाठी पुष्पदंताने शंकराचे माहात्म्य..
सांगणारे दिव्य स्तोत्र रचले..ज्यामुळे त्याला..
गत वैभव प्राप्त झाले..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
सुरवरमुनिपूज्य स्वर्ग-मोक्षैक-हेतुं।
पठति यदि मनुष्यः प्रांजलिर्नान्य-चेताः।।
व्रजति शिव-समीपं किन्नरैः स्तूयमानः।
स्तवनमिदममोघं पुष्पदन्तप्रणीतम्।। ३८।।
पुष्पदंते रचीयले ऐसे स्तोत्र
विश्वास अति असे तयास
अनुभवा संगती श्रद्धाभाव
जो जे वांछील ते लाभे त्यास
श्रेष्ठ देव..मुनी..यांना पूजनीय असे..
हे स्तोत्र..स्वर्ग..मोक्ष..मिळवून देणारे..
पुष्पदंत गंधर्वांने रचलेले हे स्तोत्र..हात..
जोडून..एकाग्र चित्ताने..पठण केले..
तर..आयुष्य संपल्यानंतर..किन्नरांच्या
जय घोषात..शिवचरणी स्थिर होतो..
पुष्पदंताने रचलेले हे स्तोत्र कधी निष्फळ..
होणार नाही..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
आसमाप्तमिदं स्तोत्रं पुण्यं गन्धर्व-भाषितम्।
अनौपम्यं मनोहारि सर्वमीश्वरवर्णनम्।। ३९।।
इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छंकर-पादयोः।
अर्पिता तेन देवेशः प्रीयतां में सदाशिवः।। ४०।।
तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर।
यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः।। ४१।।
फलदायी मंगलकारक..
सदाशिवा नमो नम:
शब्द सुमने स्वीकारा
महादेवा नमो नमः
कैसे रुप कैसे तत्व
मज काही आकळेना
जैसा भाव तैसे देवा
तरी तू मज का कळेना?
पुष्पदंत गंधर्वाने.. रचलेले..हे पुण्यकारक..
स्तोत्र..आरंभापासून..शेवटपर्यंत कोणतीही..
उपमा नाही..असे मंगलमय..मनोहारी..शिवाचे..
वर्णन..करणारे स्तोत्र इथे पूर्ण झाले आहे..
पुष्पदंत म्हणतात..माझी ही शब्द सुमनांची..
पूजा शंकराच्या...चरणी..समर्पित करतो..त्यामुळे
देवाधिदेव..सदाशिव प्रसन्न होतील..
हे महेश्वरा.. तुझे तत्व कसे आहे..तुझे रूप..
कसे आहे..याचे ज्ञान मला नाही..तू जसा..
आहेस..तसा..तुला माझा वारंवार..
नमस्कार आहे..
रसिका राजीव हिंगे
श्री शिवमहिम्नः स्तोत्रं
एककालं द्विकालं वा त्रिकालं यः पठेन्नरः।
सर्वपाप-विनिर्मुक्तः शिव लोके महीयते।। ४२।।
श्री पुष्पदन्त-मुख-पंकज-निर्गतेन।
स्तोत्रेण किल्बिष-हरेण हर-प्रियेण।।
कण्ठस्थितेन पठितेन समाहितेन।
सुप्रीणितो भवति भूतपतिर्महेशः।। ४३।।
करिता पठण स्तोत्राचे
प्रसन्न होई गौरी हरा
महापापे पळती दूर
स्तवन माझे स्वीकारा
मंगलकारक असे हे..शिवमहिम्न स्तोत्र..
जो मनुष्य भक्तीभावाने..दिवसातून..एकदा..
दोनदा..किंवा तीनदा..पठण करतो..तो..
सर्व पापांपासून मुक्त..होऊन..शिवलोकी..
आदर प्राप्त करतो..
श्री पुष्पदंत यांच्या मुखकमलातून..प्रगटलेले..
सर्व पापांचा नाश करणारे.. शिवाला अत्यंत..
प्रिय..असलेले..जो एकाग्र चित्ताने..पाठ करेल..
त्यास..सर्व भुतांचे स्वामी महादेव प्रसन्न होतात..
श्री शिवमहिम्नः स्तोत्राचा भावानुवाद समाप्त
रसिका राजीव हिंगे
No comments:
Post a Comment